Sunday, 24 August 2014

काफिला


`सुसाट रिबेल ओंन व्हील्स` या  ग्रुप बरोबर
 लेह-लदाख च्या टूर वर गेलेल्या सौ अनिता ओक यांना सुचलेल्या
या कवितेच्या सुंदर ओळी ....


काफिला 

लेह लदाख टूरची सुरवात, विमानतळावर हम पांच
चेतन पोंक्षे , अनिता -अरुण, कादंबरी विनयचा हात धरून 
अडीच वाजता श्रीनगर गाठले,  कविता -अमोल , आशुतोष भेटले 

दल सरोवर, शिकारा  सफर,  ग्रुपचे मेंबर २४ नंबर 
झोपले लवकर करून डिनर, सकाळी झरझर ...टेम्पो traveller
सोनमर्ग च्या वाटेवर ...नजारा सुंदर , कंगन गावात, सिंधू रिव्हर
हिरवेगार सजले डोंगर , तीव्र उतार , देवदार ...फर 

शुभ्र धवल बर्फाचे शिखर ...उंच उंच भिरभिरते नजर 
टेम्पो मध्ये खादाडी पोटभर, सह प्रवासी दिलदार खरोखर 
नीलिमा,वसुधा,कविता, संगीता, ... गट्टी जमली बघता बघता 
झोजीला पास ला जाताजाता, landslide ने अडला रस्ता

चार तास खोळंबा होता, JCB ने केला मोकळा रस्ता
द्रास च्या वाटेवर त्रास भलता, शूर जवानांना आठवा आता
छातीवरती वार झेलता, टायगर शहीद लढता लढता
ओपेरेशन विजय यशोगाथा, डोळे झरती स्मारक बघता

वंदन करुनी ग्रुप निघाला, कारगिल गावी मुक्कामाला
सुप्रभाती सज्ज काफिला, रक्षाबंधनी दिवस रंगला
जवान भाई रक्षक आपुला, प्रेमधागा हाती बांधला
आगळा वेगळा सण सजला, निरोप घेउनी निघे काफिला

मोनेस्टरी, Moonland, भव्यदिव्यता, निसर्गाची अफाट गूढता
जेवणासाठी घेतला थांबा, जर्दाळूचा भरपूर मेवा
अल्ची गावात मेंढीकोट रंगले, दोन कोटाचे दणके दिले
हॉटेलच्या कृपेने Wi-Fi लाभले, W. App वर संवाद साधले

असीम, रौनक मुळे रौनक खास, पत्ते ग्रुप जमला झकास
सायली, नंदा, साथीला सुजाता, मानसी आणि शलाका, गीता
लेह गावात Grand हिमालया, Hall of Fame ची वेगळी किमया
पश्मिना शाली, खडे आणि माळा, किंमत ऐकून पोटी  येई गोळा

लागली धाप, खारदुंगला पास ला, ओपन बुद्धावर उन्हाच्या झळा
नुब्रा valley त सुसाट गाड्या, चमचमणाऱ्या वाळूच्या टेकड्या
मंगोलियन उन्टांवर १५ चा काफिला, Sand Dune  वर केला कल्ला
लडाखी जेवण भरपूर ढोसा, लवकर झोप नि लवकर उठा

नाजूक फुले आणि दगड धोंडे, रस्ता चालला पुढे पुढे
भेंड्यांचा फड चांगलाच रंगला, `वारीला`, `चांगला` दम खूप लागला
पन्गोंग चा रस्ता संपता संपेना, पाणी हेच जीवन पटले सर्वांना
खडतर प्रवास १० तासांचा, डोंगर कुशीत तलाव निळा नीळा

उत्साहाला उधाण, तंबूत विसावा, तलावाच्या काठी पोझेस फोटोला
सुखरूप परत आलो लेहच्या हॉटेलला, आशु-विनयला क्रेडीट, धन्य धन्य काफिला
ठीकसे, हेमिस monestri  खास, झोरावर palace मध्ये, लदाखचा इतिहास
सिंधू घाट आणि लदाखचा थाट, लेहच्या बाजारात खरेदीचा घाट

सात तासांची सो-मोरीरी ची वाट, मुक्कामी पोहोचता थंडीचा थरथराट
टेंट मध्ये शिरून, काफिला गपगार, उठून येता बाहेर हातपाय गारगार
एकावर एक कपड्यांचे थर, सकाळी निघाल्या सुसाट traveller
किलोन्गच्या वाटेवर गाण्यांचा कहर, सह्प्रवाशांमुळे झाला मार्ग सुकर

जम्मू आणि काश्मीरची संपली वेस, दारच्या मधून हिमाचल ला प्रवेश
किलोन्गच्या हॉटेलमध्ये गारवा  सुखद, फुलझाडांमध्ये फोटोची झुंबड
रोहतांग पास हून मनालीकडे, पोपटी डोंगरांवर, शन्कू सारखी झाडे
हिरव्यागार मखमलीत, विविधरंगी फुले, मनालीच्या निसर्गात झूळझुळणारे झरे

हिरव्या मनालीचे सुंदर दर्शन, संपला आता प्रवास, निरोपाचे भजन
दुर्गम प्रदेशाची अवघड सफर , आशु-विनय मुळे सहल झाली सुंदर


- सौ. अनिता ओक              

No comments:

Post a Comment