आनंदाचे डोही आनंद तरंग
सुसाट ग्रुप सुरू केला 2010 साली..तेव्हा सुरवातीला children's camp केले..तेव्हा लहान मुले आणि कॉलेज च्या मुलांची उपस्थिती लक्षणीय असायची..आम्ही लीडर पण 40-45 वयोगटातील होतो..त्यामुळे मुले लवकर कनेक्ट व्हायची. त्यांची, तरुणांची भाषा बोलली की ते म्हणायचे अरे..हे लीडर पण आपल्या सारखेच.
पण आता हीच नेहमी ट्रेक ला येणारी पिढी शिक्षण घेऊन नोकरीला लागली..तिथल्या AC corporate culture मध्ये हरवून गेली.. कार, बाईक किंवा कंपनीच्या बस ने ऑफिस ला जाऊ येऊ लागले..hardship ची सवय मोडली..उन्हात फिरणे हा त्रास वाटू लागला..ट्रेक पेक्षा जीम ला जाणे हे प्रेस्टिज बनले.
आम्ही किंवा आमच्याहून ही वयस्कर ट्रेकर जे किल्ले, गड सहज सर करतात तिथे ही तरुण मंडळी हाफ हूफ करू लागले. त्यांना ट्रेकिंग ही मौज न वाटता त्रासदायक प्रकार वाटू लागला..आनंद कमी झाला की त्याचा परिणाम ट्रेकिंग न करणे किंवा luxury ट्रेकिंग करणे असा दिसू लागला..अनेक ट्रेकिंग क्लब नी मागणी तसा पुरवठा या तत्वांनी लक्झरी ट्रेक आयोजित करायला सुरवात केली..पण ट्रेकिंग म्हणजे चालणे आलेच. सर्व सुखसोयी, मनपसंत जेवण, झोपायला छान टेन्ट, बेड, भरगच्च नाश्ता, पिझ्झा, बर्गर, पास्ता, ब्रेड आम्लेट वगैरे मस्त लक्झरी असली तरी चालावे लागणारच दिवसभर..ते पण कमी कमी केले..टप्पे छोटे करून..पण तरुणाईचे ट्रेकिंग चे आकर्षण कमी कमी होत गेले. आता बऱ्याच ग्रुपचे average age 35-40 झाले आहे..
तर हे आनंद देणे, घेणे हा वसा सुसाट ने उचलला..ट्रेक बघता बघता भरू लागले. येणारे व्यक्तिगत दुःख, क्लेश विसरून या आनंदाच्या प्रवाहात सामील झाले. ट्रेक/ ट्रीप मध्ये कुठेही घाई नाही, जास्त कठीण चढाई नाही आणि गप्पा गोष्टी करत खात - पीत ट्रेकिंग. हे सर्व वयोगटांना भावते आणि सर्व ग्रुप एक कुटुंब बनून जाते. सध्याच्या जीवनशैली मुळे आई वडिलांचे मुलांशी बोलणे खूप कमी झाले आहे. मोठी कुटुंब नाहीत, घरात मोठी माणसे नाहीत खरंतर
या पिढीची ही गरज आहे..आई वडील वेळ देऊ शकत नाहीत पण मुलांनी मागितलेल्या वस्तू, महागडे मोबाईल देऊन ते त्याची भरपाई करायला बघतात..पण मुलांना निसर्गात नेणे, त्यांची मने रिकामी करून त्यात आनंद भरणे, लहान लहान गोष्टीतून आनंद कसा मिळवायचा हेच तर सुसाट करतेय..त्यामुळेच आमच्या बरोबर आलेले लहान लहान सहभागी पण जेव्हा असे म्हणतात की आम्ही तुमच्या ग्रुपमध्ये खूप एन्जॉय केले आणि आता नेहमी तुमच्या सोबतच येणार की हे जाणवते की आपण योग्य मार्गाने चाललोय आणि उर आनंदाने भरून येते..

No comments:
Post a Comment